महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतांना राज्यात या विविध भाषांच्या साहित्य अकादमीची आवश्यकता का आहे ?

हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोरबंजारा या विविध भाषा बोलणारे नागरीक सुद्धा राज्याचे रहिवासी असल्याने, राजभाषा मराठी आणि त्यांची मातृभाषा यांत समन्वय साधण्यासाठी तसेच भाषिक साहित्यिक देवाणघेवाण होण्याकरीता या साहित्य अकादमींची स्थापना करण्यात आलेली आहे.

हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोरबंजारा या विविध भाषांसाठीच्या साहित्य अकादमींचे कार्य काय आहे ?

महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोरबंजारा या भाषांचे जतन, संवर्धन आणि विकास तसेच राजभाषा मराठी आणि संबंधित भाषा यांत समन्वय साधण्यासाठी तसेच भाषिक आणि साहित्यिक देवाणघेवाण यासाठी या अकादमी कार्यरत आहेत.

हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोरबंजारा या अकादमी राज्यात मराठी भाषेव्यतिरिक्त इतर विविध भाषांकरिता कार्यरत आहे. याप्रमाणे मराठीसाठी राज्यात कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत ?

राज्यात मराठी भाषेकरीता स्वतंत्र प्रशासकीय विभाग आहे. या विभागाअंतर्गत चार स्वतंत्र कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयांच्या कामकाजाची सविस्तर माहिती www.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोरबंजारा या अकादमीचे कार्यालय तसेच विभागीय कार्यालय कुठे-कुठे आहे?

अकादमीचे राज्यात केवळ एकच कार्यालय असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.‌अकादमीचे कोणतेही विभागीय कार्यालय नाही.

पत्ता : महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा साहित्य अकादमी, ओल्ड कस्टम हाऊस, विकास विभाग इमारत, दुसरा मजला, शहिद भगतसिंह मार्गमुंबई – 400 001.

दूरध्वनी क्रमांक/ व्हाट्सअप क्रमांक : 022 – 22672539

मेल आयडी : mhsahityaacademy@gmail.com

या साहित्य अकादमीच्या प्रमुख योजना कोण-कोणत्या आहेत ?

साहित्य अकादमीमार्फत खालील प्रमाणे प्रमुख तीन योजना राबविल्या जातात : –

) महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये संबंधित भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.

) संबंधित भाषेच्या साहित्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कृत करणे.

) संबंधित भाषेतील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याकरीता त्यांच्या अप्रकाशित साहित्यकृतींना प्रकाशनासाठी अनुदान देणे तसेच मराठीतून संबंधित भाषेत अनुवादासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान देणे.

अकादमीच्या पुरस्कार योजनेअंतर्गत आणि पुस्तक प्रकाशन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

दरवर्षी अकादमीमार्फत राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये संक्षिप्त स्वरुपात तसेच अकादमीच्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली जाते. संकेस्थळावरील जाहिराती सोबत अर्जाचा नमुना सुध्दा असतो. सदर अर्ज करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. जाहिरातीतील विहीत नमुन्यात, विहीत कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक असते.

अकादमीच्या योजनांसाठी अर्ज करण्याकरीता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

अकादमीच्या योजनांसाठी अर्ज करण्याकरीता खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

. अर्जाचा विहित नमुना 

. महाराष्ट्रामध्ये कमीत कमी १५ वर्षे वास्तव्याबाबत अधिवास प्रमाणपत्राची ची छायाप्रत

.‌ आधार कार्ड ची छायाप्रत

.‌ PAN Card ची छायाप्रत

. Cancelled Cheque

. साहित्यकृती च्या ३ प्रती

अकादमीच्या पुरस्कार व प्रकाशन अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त अर्ज व पुस्तके यांचे परीक्षण कशा पद्धतीने करण्यात येते?

अकादमीच्या पुरस्कार व प्रकाशन अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त अर्ज व पुस्तकांचे परीक्षण अकादमीच्या समितीतील तज्ञ अशासकीय सदस्यांमार्फत करण्यात येते.

अकादमीच्या समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणुक कशी केली जाते.? सदस्य संख्या मर्यादा तसेच कार्यकाळ किती असतो?

अकादमीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक अकादमीचे पदसिद्ध मा. अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य‌ विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्या मान्यतेने केली जाते. या समितीवर जास्तीत जास्त 11 अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येते. या समितीचा कार्यकाळ साधारणतः तीन वर्षांचा असतो.

अकादमीमार्फत कोणकोणत्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते ?

अकादमीमार्फत साहित्यिक व सांस्कृतिक स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षातून एकदा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

अकादमीमार्फत साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कुठे केले जाते?

अकादमीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असल्याने राज्यातील विविध शहरांमध्ये अकादमी द्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

अकादमीमार्फत आयोजित कार्यक्रमांसाठी प्रवेश शुल्क किती असते?

अकादमीमार्फत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम नागरीकांसाठी नि:शुल्क असतात. प्रवेश/आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यया तत्वावर केली जाते.